छळतसे काजळकाळी रात
छळतसे काजळकाळी रात
नभीं चंद्रमा धवल पौर्णिमा, तरीहि मी तिमिरात
सूर जुळविले जिथे अंगणी
मधुर छेडिली एक रागिणी
अबोल झाली सतार का रे, आज तुझ्या विरहात
छळतसे काजळकाळी रात
प्राणांची तू घालुनी फुंकर
प्रीतिचा फुलविलास अंकुर
अमृतात ही न्हाली लतिका, कोमेजली निमिषात
छळतसे काजळकाळी रात
नको चांदणे, नको गंध हा
आर्त स्वरांचा नको छंद हा
एक स्मृती तव त्या स्पर्शांची, अमर असो हृदयात
माजु दे काजळकाळी रात
नभीं चंद्रमा धवल पौर्णिमा, तरीहि मी तिमिरात
सूर जुळविले जिथे अंगणी
मधुर छेडिली एक रागिणी
अबोल झाली सतार का रे, आज तुझ्या विरहात
छळतसे काजळकाळी रात
प्राणांची तू घालुनी फुंकर
प्रीतिचा फुलविलास अंकुर
अमृतात ही न्हाली लतिका, कोमेजली निमिषात
छळतसे काजळकाळी रात
नको चांदणे, नको गंध हा
आर्त स्वरांचा नको छंद हा
एक स्मृती तव त्या स्पर्शांची, अमर असो हृदयात
माजु दे काजळकाळी रात
गीत | - | पुरुषोत्तम दारव्हेकर |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वर | - | कुमुद कामेरकर |
नाटक | - | नयन तुझे जादुगार |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, नाट्यसंगीत |
निमिष | - | पापणी लवण्यास लागणारा काळ. |