चंपक गोरा कर कोमल हा
चंपक गोरा कर कोमल हा करात तुझिया देते
नेशील तेथे येते, सखया, नेशील तेथे येते
चैत्रतरूंच्या छायेमधला गोड गारवा प्रेमे कवळू
फुलाफुलांच्या हृदयामधला मधुमासाचा सुगंध उधळू
पवनामधुनी सूर गुंजता तुझे गीत मी गाते
निळ्या नभाचे तेज उतरता मोहक सुंदर वातावरणी
दोन मनांचा संगम बघुनी हसू लागली ही जलराणी
लाजत लाजत प्रीत देखणी जिथे मोहुनी बघते

गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभू |
स्वर | - | उषा मंगेशकर |
चित्रपट | - | लक्ष्मी आली घरा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
चंपक | - | (सोन) चाफा. |
Print option will come back soon