A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रिमझिम करी बरसात मेघा

रिमझिम करी बरसात, मेघा !

गात गात मल्हारगान
विसरुनिया देहभान
अनवाणी फिरतो मी प्रिय सखीच्या शोधात !

परिसुनी हे सूर बनी
जल झरता मृगनयनी
ओलेती येईल ती मोहुनिया नादात !

धारांच्या मंडपात
मीलन मग पावसात
सम धरुनी वीज वरी कडकडू दे गगनात !
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत पवार
स्वर- सुरेश हळदणकर
चित्रपट - अबोली
गीत प्रकार - चित्रगीत, ऋतू बरवा
परिसा - ऐकणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.