चांद मातला मातला
चांद मातला मातला, त्याला कशी आवरू?
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू?
कशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा
गेल्या हरवून दिशा झाले खुळे पाखरू
आला समुद्र ही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा
वेड्या लहरींचा पिंगा बाई झाला की सुरू
गोड गारव्याचा वारा, देह थरारला सारा
चांद अमृताचा मनी बाई लागला झरू
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू?
कशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा
गेल्या हरवून दिशा झाले खुळे पाखरू
आला समुद्र ही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा
वेड्या लहरींचा पिंगा बाई झाला की सुरू
गोड गारव्याचा वारा, देह थरारला सारा
चांद अमृताचा मनी बाई लागला झरू
गीत | - | वसंत बापट |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | उंबरठा |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, चित्रगीत |
चेतणे | - | भडकणे. |
मातणे | - | उन्मत्त होणे. |
Print option will come back soon