चांद मोहरे चांदणे झरे
चांद मोहरे, चांदणे झरे
झोपेतच गाली असा हसशी का बरे?
गगनातील नीलपरी, उतरुनिया भूमीवरी
उचलुनिया नेती तुला उंच काय रे?
उंच उंच गगनी तुला, काय दिसे सांग मुला
दिसते का हळू विमान एक संचरे
बसून आत कोण हसे, कुशल कुणी तरुण पुसे
खचित तेच प्राणनाथ सांगू काय रे
जाग जरा नीज सोड, पापा दे मजसी गोड
फिरुनी जाय लंघुनीया सात अंबरे
झोपेतच गाली असा हसशी का बरे?
गगनातील नीलपरी, उतरुनिया भूमीवरी
उचलुनिया नेती तुला उंच काय रे?
उंच उंच गगनी तुला, काय दिसे सांग मुला
दिसते का हळू विमान एक संचरे
बसून आत कोण हसे, कुशल कुणी तरुण पुसे
खचित तेच प्राणनाथ सांगू काय रे
जाग जरा नीज सोड, पापा दे मजसी गोड
फिरुनी जाय लंघुनीया सात अंबरे
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | आशा भोसले |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, भावगीत |
लंघणे (उल्लंघणे) | - | ओलांडणे, पार करणे. |