चंदाराजा ये
चंदाराजा ये, चंदाराजा ये
निळ्यानिळ्या आभाळात
लखलखत्या चांदण्यात
शुभ्र रुपेरी रथात बसून इथे ये
चंदाराजा ये
शुभ्र रुप्याची गाडी
पळवी सश्यांची जोडी
दूर करून अंधारा उजळित नभ ये
चंदाराजा ये
या इथे मी तुजवाचुन
व्याकुळ हो तूच जाण
हेच देई मनोरथा पुरविण्यास ये
चंदाराजा ये
निळ्यानिळ्या आभाळात
लखलखत्या चांदण्यात
शुभ्र रुपेरी रथात बसून इथे ये
चंदाराजा ये
शुभ्र रुप्याची गाडी
पळवी सश्यांची जोडी
दूर करून अंधारा उजळित नभ ये
चंदाराजा ये
या इथे मी तुजवाचुन
व्याकुळ हो तूच जाण
हेच देई मनोरथा पुरविण्यास ये
चंदाराजा ये
गीत | - | विजय सोनाळकर |
संगीत | - | विजय सोनाळकर |
स्वर | - | आशालता वाबगावकर |
नाटक | - | गणपती बाप्पा मोरया |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |