A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चंदनासी परिमल आम्हां काय

चंदनासी परिमल आम्हां काय त्याचे
तुझे नाम गोड किती घेऊ आम्ही वाचे

आम्हा काय त्याचे चंद्र-सूर्य प्रकाशता
होई काया शुद्ध-स्वच्छ तुझे नाम घेता

कटेवरी घेउनी कर उभा तोची राहे
दास ह्मणे जाता शरण हरी वाट पाहे
कटि - कंबर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.