सजवू या हा संसार
सजवू या हा संसार आपुला, या हो तुम्ही पतीदेव या
घर जणू सागर, तुम्ही विष्णू, मी लक्षुमी पाय चरावया
अणा लागला आज पासुनी रोज रोज तुमच्या मागे
संसाराची उतरंड रचू, एकच दोघे होऊया
दुसरे आणा, हे घ्या तिसरे, एकावरती एक रचू
प्रेम आपुले माणिकमोती, यात भरुनी ठेवूया
कोंड्याचा मी करीन मांडा, तुला राजसा काय कमी

गीत | - | नामदेव व्हटकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | आहेर |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
अणा लागणे | - | अचानक वाईट किंवा त्रासदायक काहीतरी अनुभवणे. |
उतरंड | - | खाली मोठे व वर लहान भांडे ठेऊन केलेली रचना. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.