A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गाव तुझा तो पैलतिरी

गाव तुझा तो पैलतिरी, गाव माझा ऐलतिरी

रोज आपुल्या त्या नजरांचा
संगम-सेतू बांधायाचा
सप्त-सुरंगी इंद्रधनूपरी पाण्यावरती अधांतरी

लाल-बदामी नवखे पाणी
हुरळुनि चुंबित हिरवी धरणी
मन विरघळता कणाकणांनी, प्रीत नहाते महापुरी

शब्द थांबला कवितेसाठी
आली कविता शब्दासाठी
अर्थ रंगता अपुल्या ओठी, गुंजत राहू एकसुरी
गीत- पी. सावळाराम
संगीत - विठ्ठल शिंदे
स्वर - विठ्ठल शिंदे
गीत प्रकार - भावगीत

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  विठ्ठल शिंदे