चंदनाच्या देव्हार्यात
चंदनाच्या देव्हार्यात उभा पांडुरंग
मुकेपणा आज माझा आळवी अभंग
झिजविला देह सारा उगाळिला जन्म
सेवा हाच माझा आहे खरा देवधर्म
नका करू कुणी माझ्या समाधीचा भंग
मातीचे गा सोने झाले, सोनियाची माती
तोडिले मी धागे धागे, जोडियली नाती
हातपाय असुनी मी जाहलो अपंग
मुकेपणा आज माझा आळवी अभंग
झिजविला देह सारा उगाळिला जन्म
सेवा हाच माझा आहे खरा देवधर्म
नका करू कुणी माझ्या समाधीचा भंग
मातीचे गा सोने झाले, सोनियाची माती
तोडिले मी धागे धागे, जोडियली नाती
हातपाय असुनी मी जाहलो अपंग
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | देवघर (१९८१) |
गीत प्रकार | - | चित्रगीत, विठ्ठल विठ्ठल |