चांदण्यात ह्या धरणी
चांदण्यात ह्या धरणी हसते, चंद्र हसे गगनी
चांदणे फुलले माझ्या मनी
आभाळाची धरणीवरती
अशीच आहे अखंड प्रीती
त्या प्रीतीच्या शीतलतेने सुखावली रजनी
ओली वाळू झाली रुपेरी
नाचनाचती सागरलहरी
माडामधुनी लबाड वारा आळवितो गाणी
या चंद्राच्या अनंत लीला
उपमा नाही अवखळतेला
अर्थासाठी आतुरली ही शब्दमयी वाणी
चांदणे फुलले माझ्या मनी
आभाळाची धरणीवरती
अशीच आहे अखंड प्रीती
त्या प्रीतीच्या शीतलतेने सुखावली रजनी
ओली वाळू झाली रुपेरी
नाचनाचती सागरलहरी
माडामधुनी लबाड वारा आळवितो गाणी
या चंद्राच्या अनंत लीला
उपमा नाही अवखळतेला
अर्थासाठी आतुरली ही शब्दमयी वाणी
| गीत | - | जगदीश खेबूडकर |
| संगीत | - | दत्ता डावजेकर |
| स्वर | - | लता मंगेशकर |
| चित्रपट | - | घरची राणी |
| गीत प्रकार | - | चित्रगीत, शब्दशारदेचे चांदणे |
भालजी पेंढारकरांची नेहमीची पद्धत अशी होती. अगोदर भरपूर तालमी व मग शूटींग !
दत्ता डावजेकर यांचे असेच हाल झाले. सकाळी १० ते संध्याकाळी ५/६ वाजेपर्यंत त्यांनी दिलेल्या खोलीत डावजेकर व त्यांचा तबलजी दोघेच चाल लावीत बसत असत. अशा तर्हेने चाली लावण्याची त्यांना मुळीच सवय नव्हती. शेवटी संध्याकाळी बाबा (भालजी) व त्यांचे काही सहकारी आले. श्री. डावजेकरांनी चाल ऐकवली. सर्वांनीच 'वाहवा' दिल्यावर बाबा म्हणाले, "ठीक आहे."
ते गाणं होतं 'चांदण्यात ह्या धरणी हसते'
(संपादित)
सौजन्य- श्री भारत बुक डेपो, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












इतर संदर्भ लेख