A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गीत होऊन आले सुख माझे

गीत होऊन आले सुख माझे आले, साजणा
स्वप्‍न कल्पनेत होते सूर-ताल तेच झाले, साजणा

गीत राणी स्वये तू, तूच माझी, माझी भावना
आस तूच या स्वरांना, रंग मैफलीचा, सजणी तूच ना?

गीत माझे-तुझे हे, तूच माझी, माझी भावना !

अशा सहवासी जीव सुखवासी
कुणी जन्म गुंफिले सांग ना?
साजणी, सांग ना !

गीत माझे-तुझे हे, तूच माझी, माझी भावना !

कुहूकुहू बोले, कोयल बोले रे
जणू तुझे-माझे राजा
तिने सोनेरी सोनेरी गीत गाईले, साजणा

गीत माझे-तुझे हे, तूच माझी, माझी भावना !

तुझे-माझे घर सुखाचा संसार
दीठ संसारा न लागो, साजणा
स्वये - स्वत:

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुरेश वाडकर, वर्षा भोसले