A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नाथा तुझी मी जाहले

नाथा तुझी मी जाहले
हे भाग्य दैवे लाभले

लाभे मला हा सोहळा
मी कोठली तू कोठला
नाते जुळे तरी आपुले

लाभे मला प्रीती इथे
मज लाभली माया इथे
माझे मला घर लाभले

पुरते न येई सांगता
सारे मिळे ना मागता
सुख लाभले स्वप्‍नातले
गीत - सुधीर मोघे
संगीत - श्रीधर फडके
स्वर- आशा भोसले
चित्रपट - लक्ष्मीची पाऊले
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.