चांदोमामा चांदोमामा
चांदोमामा, चांदोमामा.. भागलास काय?
घरचा अभ्यास केलास काय?
चांदोमामा, चांदोमामा.. लपलास काय?
पुस्तक हरवून बसलास काय?
चांदोमामा, चांदोमामा.. रुसलास काय?
गणितात भोपळा घेतलास काय?
घरचा अभ्यास केलास काय?
चांदोमामा, चांदोमामा.. लपलास काय?
पुस्तक हरवून बसलास काय?
चांदोमामा, चांदोमामा.. रुसलास काय?
गणितात भोपळा घेतलास काय?
गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | संजीवनी खळे |
गीत प्रकार | - | बालगीत, शब्दशारदेचे चांदणे |