A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझे नि माझे इवले गोकुळ

तुझे नि माझे इवले गोकुळ
दूर आपुले वसवू घरकुल

घरट्यापुढती बाग चिमुकली
जाईजुईच्या प्रसन्‍न वेली
कोठे मरवा कुठे मोगरा
सतत उधळितो सुगंध शीतल

त्या उद्यानी सायंकाळी
सुवासिनी तू सुमुख सावळी
वाट पाहशील निज नाथाची
अधीरपणाने घेशिल चाहूल

चंद्र जसा तू येशिल वरती
मी डोळ्यांनी करीन आरती
नित्य नवी ती भेट आपुली
नित्य नवा तो प्रमोद निर्मल
प्रमोद - आनंद.
मरवा - सुगंधी पाने असलेली एक वनस्पती.

 

  पं. हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर