ही कशानं धुंदी आली
ही कशानं धुंदी आली
काही समजं ना, काही उमजं ना
ह्यो चांद नभी, ही पुनव उभी रेशमी धुक्यानं न्हाली
किरणांचा पिसारा फुलतो रं
जीव अंतराळी ह्यो झुलतो ग
मन हुरहुरलं, का बावरलं, ही कशाची जादू झाली
ही कुजबुज कुजबुज कसली
ही पानं खुदुखुदु हसली
लाडीगोडी बघुन, छेडाछेडी करून, चांद लबाड हसतो गाली
लई टिपूर टिपूर ही रात अशी
आली पिरतीचं गाणं गात जशी
दोन्ही डोळं मिटून, आज आली कुठुन, मला गुलाबी कोडं घाली

गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी |
चित्रपट | - | असला नवरा नको ग बाई |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत, शब्दशारदेचे चांदणे |