A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चंद्र आहे साक्षिला

पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला!

चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रिला
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला!

स्पर्श हा रेशमी, हा शहारा बोलतो
सूर हा ताल हा, जीव वेडा डोलतो
रातराणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला!

लाजरा, बावरा, हा मुखाचा चंद्रमा
अंग का चोरिसी दो जिवांच्या संगमा
आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला!

 

Random song suggestion
  आशा भोसले, सुधीर फडके