सांगा मुकुंद कुणीं हा
सांगा मुकुंद कुणीं हा पाहिला?
रासक्रीडा करितां वनमाळी
सखे होतों आम्ही विषयविचारी
टाकुनी गेला तो गिरिधारी
कोठें गुंतून बाई हा राहिला?
सांगा मुकुंद कुणीं हा पाहिला?
गोपी आळविती हे व्रजभूषणा हे
वियोग अम्हांलागी तुझा ना साहे
भावबळें वनिता व्रजाच्या
बोलाउन सुताप्रती नंदाजीच्या
प्रेमपदी यदुकुळटिळकाच्या
म्हणे होनाजी देह हा वाहिला
सांगा मुकुंद कुणीं हा पाहिला
रासक्रीडा करितां वनमाळी
सखे होतों आम्ही विषयविचारी
टाकुनी गेला तो गिरिधारी
कोठें गुंतून बाई हा राहिला?
सांगा मुकुंद कुणीं हा पाहिला?
गोपी आळविती हे व्रजभूषणा हे
वियोग अम्हांलागी तुझा ना साहे
भावबळें वनिता व्रजाच्या
बोलाउन सुताप्रती नंदाजीच्या
प्रेमपदी यदुकुळटिळकाच्या
म्हणे होनाजी देह हा वाहिला
सांगा मुकुंद कुणीं हा पाहिला
गीत | - | शाहीर होनाजी बाळा |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | आशा भोसले, पंडितराव नगरकर |
चित्रपट | - | अमर भूपाळी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर, लावणी |
वनिता | - | स्त्री. |
व्रज | - | गवळ्यांची वाडी, समुदाय. |
विषयवासना (विषय) | - | कामवासना. |
सुत | - | पुत्र. |