चंद्रा रे मी तुझी रोहिणी
चंद्रा रे मी तुझी रोहिणी
पाहते तुला मोहुनी, लाजुनी
दो जिवांचे अमृत मीलन
रिमझिम बरसत नील नभांतुन
मोहरलेली स्पर्श फुलातून
अंतरीची रातराणी
चंद्रबींब तव समीप आले
चकोर नयनी नाचू लागले
भाव मनाचे हसले लपुनी
फुलत्या कमळातुनी
तुझे नि माझे बांधुन डोळे
लपंडाव ही प्रीत खेळे
अधरावरले गीत गोड ते
गाई रात्र चांदणी
पाहते तुला मोहुनी, लाजुनी
दो जिवांचे अमृत मीलन
रिमझिम बरसत नील नभांतुन
मोहरलेली स्पर्श फुलातून
अंतरीची रातराणी
चंद्रबींब तव समीप आले
चकोर नयनी नाचू लागले
भाव मनाचे हसले लपुनी
फुलत्या कमळातुनी
तुझे नि माझे बांधुन डोळे
लपंडाव ही प्रीत खेळे
अधरावरले गीत गोड ते
गाई रात्र चांदणी
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | भाव तेथे देव |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, चित्रगीत |
चकोर | - | चांदणे हेच ज्याचे जीवन असा एक पक्षी. |