A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चंद्रातुनी तुझ्या या

चंद्रातुनी तुझ्या या बरसात चांदण्याची
लाजू नकोस राणी दे साथ जीवनाची
दे साथ जीवनाची !

बिलगून आज बोले ही प्रीत साजणाची
आले नवी वधू मी, ही रात मीलनाची
ही रात मीलनाची !

हा कुंभ चंद्रिकेचा ओतीत शुभ्र धारा
उबदार गारव्याचा अंगावरी शहारा
आली जणू कळी ही उमलून यौवनाची
दे साथ जीवनाची !

माझ्या पुढे उभी तू लेऊन रूप साज
का हासते कळेना डोळ्यांमधील लाज
समजूत काढवेना या बावर्‍या मनाची
ही रात मीलनाची !

हाती तुझ्याच हात, हा स्पर्श अमृताचा
घुमतो मनात सूर संसार संगीताचा
गाऊ मिळून नांदी भावी सुखी क्षणांची
दे साथ जीवनाची !
चंद्रिका - चांदणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.