चंद्रिका ही जणुं
चंद्रिका ही जणुं ठेवि या स्नेहें कमलांगणीं ।
कुमुदबांधव श्यामला मेघा तस्कर मानोनी ॥
चंद्रसदननभमंडला मेघांनीं वेढियलें ।
शोभाधन विपुल तें लपवितां कोपें भरलें ।
शोधित वेगें दशदिशा भूवरी सकल आलें ।
आतां निकरें सरसावले, दिसत ही या क्षणीं ॥
कुमुदबांधव श्यामला मेघा तस्कर मानोनी ॥
चंद्रसदननभमंडला मेघांनीं वेढियलें ।
शोभाधन विपुल तें लपवितां कोपें भरलें ।
शोधित वेगें दशदिशा भूवरी सकल आलें ।
आतां निकरें सरसावले, दिसत ही या क्षणीं ॥
गीत | - | कृ. प्र. खाडिलकर |
संगीत | - | गोविंदराव टेंबे |
स्वराविष्कार | - | ∙ मास्टर दीनानाथ ∙ कृष्णराव शेंडे ∙ छोटा गंधर्व ∙ सुरेश वाडकर ∙ प्रभाकर कारेकर ∙ आशा भोसले ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | मानापमान |
राग | - | अरब्बी, दुर्गा |
ताल | - | दादरा |
चाल | - | मनुजा सुगुण |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, नाट्यसंगीत |
चंद्रिका | - | चांदणे. |
निकर | - | जोर / अतिरेक / पराकाष्ठा. |
संगीतकारानं दिलेली चाल त्याच्या सूचनांबरहुकूम गाणं ही केवळ यांत्रिक क्रिया झाली. पार्श्वगायकानं मनानं स्वतः संगीतकार असावं लागतं. तरच संगीतकारांच्या चालीचं, कवीच्या शब्दांचं मर्म ओळखता येतं. गायकानं गाण्याचं आईपण नाही, दाईपण घ्यावं. गाण्याच्या फुलण्यातला आनंद स्वतःत रुजवून घेतला, तरच त्याची रसिकांवर बरसात करता येते.
परंपरेनं चालत आलेल्या चालींमध्ये बाबांनी स्वतःच्या प्रतिभेने बदल केले होते. त्यांनी मानापमानातल्या गाण्यांच्या चाली बदलल्या तेव्हा केवढा गहजबच उठला होता. पण नंतर त्याच चाली रूढ झाल्या. अधिक अर्थवाही म्हणून मान्यता पावल्या. याला कारण म्हणजे बाबांचा संगीतकार म्हणून असलेला वकूब. शब्दांची आणि सुरांची समज.
(संपादित)
मीना मंगेशकर-खडीकर
'मोठी तिची सावली' या पुस्तकातून.
शब्दांकन- प्रवीण जोशी
सौजन्य- परचुरे प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.