छत आकाशाचे आपुल्या
छत आकाशाचे आपुल्या घराला, सखये
तृणांकुरांची शय्या आणिक तुझाच बाहु उशाला,
या शापित आयुष्याला
छत आकाशाचे आपुल्या घराला, सखये
गळ्यात घालुनी गळे सखये मिळुनी ही धुंद करू उपवने
सुरांत मिसळून सूर उलगडू दोन जिवांची मने
स्वैर मोकळे पिसाट जगूया भिरकावुनी दुनियेला
या शापित आयुष्याला
छत आकाशाचे आपुल्या घराला, सखये
साहु कशी विजने प्रियतमे, जाऊ नको परदेशी
तुझ्यावाचुनी मोडून घरटे होईन मी वनवासी
पंख नभाचे लावून उडुया, सोडून या धरतीला
या शापित आयुष्याला
छत आकाशाचे आपुल्या घराला, सखये
तृणांकुरांची शय्या आणिक तुझाच बाहु उशाला,
या शापित आयुष्याला
छत आकाशाचे आपुल्या घराला, सखये
गळ्यात घालुनी गळे सखये मिळुनी ही धुंद करू उपवने
सुरांत मिसळून सूर उलगडू दोन जिवांची मने
स्वैर मोकळे पिसाट जगूया भिरकावुनी दुनियेला
या शापित आयुष्याला
छत आकाशाचे आपुल्या घराला, सखये
साहु कशी विजने प्रियतमे, जाऊ नको परदेशी
तुझ्यावाचुनी मोडून घरटे होईन मी वनवासी
पंख नभाचे लावून उडुया, सोडून या धरतीला
या शापित आयुष्याला
छत आकाशाचे आपुल्या घराला, सखये
गीत | - | किशोर पाठक |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वर | - | अजितकुमार कडकडे |
नाटक | - | कधीतरी कोठेतरी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
उपवन | - | बाग, उद्यान. |
तृण | - | गवत. |
विजन | - | ओसाड, निर्जन. |