A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
छेडियल्या तारा

छेडियल्या तारा
ते गीत येईना जुळून!
फुलते ना फूल तोच
जाय पाकळी गळून!

आकारून येत काहि
विरते निमिषात तेहि
स्वप्‍नचित्र पुसुनि जाय
रंग रंग ओघळून!

क्षितिजाच्या पार दूर
मृगजळास येइ पूर
लसलसते अंकुर हे
येथ चालले जळून!
गीत- शान्‍ता शेळके
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वराविष्कार - पं. वसंतराव देशपांडे
शौनक अभिषेकी
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक- हे बंध रेशमाचे
राग- मिश्र मांड
गीत प्रकार - नाट्यगीत
निमिष - पापणी लवण्यास लागणारा काळ.
मृगजळ - आभास.
लसलशीत - टवटवीत.

 

  पं. वसंतराव देशपांडे
  शौनक अभिषेकी