चिकना चिकना म्हावरा माजा
घेऊनशी जा रं ताजा ताजा
चिकना चिकना म्हावरा माजा
इस्वास ठेव रं सांगतंय नक्की
याचे फुरं ती कोंबरी फिक्की
अंगान जोर येईल कामकाजा
चिकना चिकना म्हावरा माजा
दिसतस मेल्या बोंबलावानी
खाशील तर होशील भोपल्यावानी
ताकतीचे दव्याचा यो राजा
चिकना चिकना म्हावरा माजा
तलूनशी खा जा रं गरम गरम
मिटुनशी जाईल सगला भरम
वाजल खुशीचा बेंडबाजा
चिकना चिकना म्हावरा माजा
म्हावरा हाय माझा सोन्यावानी
बगतस कला तू कावल्यावानी
बोंबील वाकटी सुकट खा जा
चिकना चिकना म्हावरा माजा
बोलू नको नाय बर्पाचा ह्यो
नीट बग नई कालपर्वाचा यो
वास कला घेतस चल फुट जा
चिकना चिकना म्हावरा माजा
चिकना चिकना म्हावरा माजा
इस्वास ठेव रं सांगतंय नक्की
याचे फुरं ती कोंबरी फिक्की
अंगान जोर येईल कामकाजा
चिकना चिकना म्हावरा माजा
दिसतस मेल्या बोंबलावानी
खाशील तर होशील भोपल्यावानी
ताकतीचे दव्याचा यो राजा
चिकना चिकना म्हावरा माजा
तलूनशी खा जा रं गरम गरम
मिटुनशी जाईल सगला भरम
वाजल खुशीचा बेंडबाजा
चिकना चिकना म्हावरा माजा
म्हावरा हाय माझा सोन्यावानी
बगतस कला तू कावल्यावानी
बोंबील वाकटी सुकट खा जा
चिकना चिकना म्हावरा माजा
बोलू नको नाय बर्पाचा ह्यो
नीट बग नई कालपर्वाचा यो
वास कला घेतस चल फुट जा
चिकना चिकना म्हावरा माजा
गीत | - | शाहीर विठ्ठल उमप |
संगीत | - | मधुकर पाठक |
स्वर | - | शाहीर विठ्ठल उमप |
गीत प्रकार | - | कोळीगीत (दर्यागीत) |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.