गीत हे गाशील तेव्हा
गीत हे गाशील तेव्हा मी जगी असणार नाही
प्रीत ही स्मरशील तेव्हा मी तुला दिसणार नाही
कालचे ना आज पाणी, अर्थ हे उरणार नाहीत
पाहुनी चंद्राकडे मी आसवें पुसणार नाही
चांदणे बिलगेल अंगा कोवळे रेशीम होऊन
त्या क्षणी पाऊल माझे हे पुन्हा फसणार नाही
प्रीत ही स्मरशील तेव्हा मी तुला दिसणार नाही
कालचे ना आज पाणी, अर्थ हे उरणार नाहीत
पाहुनी चंद्राकडे मी आसवें पुसणार नाही
चांदणे बिलगेल अंगा कोवळे रेशीम होऊन
त्या क्षणी पाऊल माझे हे पुन्हा फसणार नाही
गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | अनिल-अरुण |
स्वर | - | अनुराधा पौडवाल |
गीत प्रकार | - | भावगीत |