A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चिमण्या पांखरांचे चिमणे ग

चिमण्या पांखरांचे चिमणे ग घरकुल
चिमणे पंख मऊ चिमणी ग किलबिल !

कालच्या वादळाची नाही ग आठवण
उद्याची नाही चिंता नाही ग साठवण
हालत्या फांदीवरी डोलती वंशवेल !

आभाळ वर निळे विशाल खाली जग
झाडांच्या मनोर्‍यांत चिमणे लोभ-राग
प्रहार करू जाता वाराही थरारेल !

पाखरं आभाळाची, आधार धरणीचा
देखावा मनोहर देवाच्या करणीचा
वेगाने धावताना काळ उडुनि जाईल !
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत पवार
स्वर- आशा भोसले
चित्रपट - चिमणी पाखरं
गीत प्रकार - चित्रगीत

 

Print option will come back soon