A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चिमुकले घरकुल अपुले छान

चिमुकले घरकुल अपुले छान
शांती-सुखाचे वाटे अविरत गाती येथे गान

किरण उषेचे पहिल्या प्रहरी
तोरण झळके पुढच्या दारी
दारी मागल्या रम्य सुमंगल संध्येचे वरदान

लाली-लाल गुलमोहर फुलतो
ग्रीष्माचा कटु ताप हरवितो
गारवेलीवर किती पाखरे घेती गुंगूनी तान

जगावेगळे जग हे इथले
दोन जीव हे जेथे रमले
ह्या विश्वाचा तू निर्माता म्हणुनी तुझा अभिमान