चुकवित लाख डोळे
          चुकवित लाख डोळे चोरूनिया निघाले
जागेपणी तुझ्या मी स्वप्नात आज आले
घडणार जे उद्याला ते आज पाहते मी
लावीन हात तेथे आनंद निर्मिते मी
पात्री रितेपणाच्या भरिते सुरम्य झेले
माझ्याविना न येथे छाया दुजा कुणाची
जाणीव गुंजते रे उरी आपलेपणाची
माझ्यातुझ्या घराची मी मालकीण झाले
गृहिणीपदासवे ये संजीवनी करी या
संसार थाटला मी स्वप्नातल्या घरी या
मौनी मनोगताचे संगीत आज झाले
          जागेपणी तुझ्या मी स्वप्नात आज आले
घडणार जे उद्याला ते आज पाहते मी
लावीन हात तेथे आनंद निर्मिते मी
पात्री रितेपणाच्या भरिते सुरम्य झेले
माझ्याविना न येथे छाया दुजा कुणाची
जाणीव गुंजते रे उरी आपलेपणाची
माझ्यातुझ्या घराची मी मालकीण झाले
गृहिणीपदासवे ये संजीवनी करी या
संसार थाटला मी स्वप्नातल्या घरी या
मौनी मनोगताचे संगीत आज झाले
| गीत | - | ग. दि. माडगूळकर | 
| संगीत | - | सुधीर फडके | 
| स्वर | - | आशा भोसले | 
| चित्रपट | - | गुरूकिल्ली | 
| गीत प्रकार | - | चित्रगीत, नयनांच्या कोंदणी | 
| झेला | - | गुच्छ / नक्षी. | 
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.
            
 
   
   
   
   
   
   
   
   
   
  











 दाद द्या अन् शुद्ध व्हा !
 दाद द्या अन् शुद्ध व्हा !