छुन छुन बोलतीया
छुन छुन बोलतीया हातामधी घांट
प्रीत माझी चालतीया जेजुरीची वाट
मार्गसर आला बाई बाळपण गेलं
अंगामधी अंग असं चोरटं आलं
डोईमधी मरवा साज संग हिरवा
मोतियाचा गजरा भरजरी थाट
काल माझा झाला राया साखरपुडा
देवाच्या नावानं रं भरलाय् चुडा
लाजरी बुजरी पोर झाली नवरी
पापणीनं धरलाय अंतरपाट
नजरेच्या पाखरा मारु नको खडं
काळजाच्या धडधड येऊ नको पुढं
लागाबांधा तोड रं नाद माझा सोड
मल्हारीची नार मी, हट, सोड माझी वाट
प्रीत माझी चालतीया जेजुरीची वाट
मार्गसर आला बाई बाळपण गेलं
अंगामधी अंग असं चोरटं आलं
डोईमधी मरवा साज संग हिरवा
मोतियाचा गजरा भरजरी थाट
काल माझा झाला राया साखरपुडा
देवाच्या नावानं रं भरलाय् चुडा
लाजरी बुजरी पोर झाली नवरी
पापणीनं धरलाय अंतरपाट
नजरेच्या पाखरा मारु नको खडं
काळजाच्या धडधड येऊ नको पुढं
लागाबांधा तोड रं नाद माझा सोड
मल्हारीची नार मी, हट, सोड माझी वाट
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | सुंदरा मनामधे भरली |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
घांट | - | घंटा. |
मरवा | - | सुगंधी पाने असलेली एक वनस्पती. |
मार्गसर | - | मार्गशीर्ष. भारतीय पंचांगानुसार वर्षातील नववा महिना. |
Print option will come back soon