A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दादा रुसला ताई रुसली

दादा रुसला ताई रुसली, रुसली आज आई
काय करावे काही कळेना, बाई !

म्हणती सारे आज मला, भली खोड की जिरली
शाळा सुटता धावत येता स्वारी घसरून पडली
आई म्हणते, मला आजला कसली आहे घाई?

घाई कसली समजत नाही? लगीन बाहुलीचे !
आईलाही कसे कळेना मन हे आईचे !
माझी छकुली नवरी झाली, आज सासरी जाई

हसती सारे मोठ्याने पण डोळा माझ्या पाणी
नवरदेव हा किती धिटुकला घेऊन जाई राणी
कशी कळेना घडली बाई सारीच ही नवलाई
गीत - प्रवीण दवणे
संगीत - नंदू होनप
स्वर- देवकी पंडित
गीत प्रकार - बालगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.