दहा वीस असती का रे
दहा वीस असती का रे मने उद्धवा !
एक मात्र होते ते मी दिले माधवा
पाच इंद्रियांचा मेळा दास त्या मनाचा
तनु-मना एकच माझ्या ध्यास मोहनाचा
कुणीतरी मेघःश्यामा इथे आणवा
नसे देव ठावा मजला राव द्वारकेचा
बाळकृष्ण ओळखते मी सखा राधिकेचा
फेर धरा यमुनातिरी गोप नाचवा
एक स्पर्श व्हावा, यावा वास कस्तुरीचा
एक हाक द्यावी प्यावा सूर बासरीचा
लोचनांस माझ्या यावा पूर आसवा
एक मात्र होते ते मी दिले माधवा
पाच इंद्रियांचा मेळा दास त्या मनाचा
तनु-मना एकच माझ्या ध्यास मोहनाचा
कुणीतरी मेघःश्यामा इथे आणवा
नसे देव ठावा मजला राव द्वारकेचा
बाळकृष्ण ओळखते मी सखा राधिकेचा
फेर धरा यमुनातिरी गोप नाचवा
एक स्पर्श व्हावा, यावा वास कस्तुरीचा
एक हाक द्यावी प्यावा सूर बासरीचा
लोचनांस माझ्या यावा पूर आसवा
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | स्नेहल भाटकर |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | अन्नपूर्णा |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, चित्रगीत |
कस्तुरी | - | एक अतिशय सुगंधी द्रव्य. |
Print option will come back soon