A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी मोठ्ठा होणार किनई मी

मी मोठ्ठा होणार किनई मी खूप खूप शिकणार
भारत माझी आई, आईचे सार्थक मी करणार !

घरात आई धडा शिकवते, शिवरायाची गोष्ट सांगते
शिवरायाच्या जशी चालवीन शत्रुवर तलवार

शाळेच्या वर्गाचे गुरुजी, त्यांची माझ्यावरती मर्जी
शिकवितात ते अक्षर-संख्या, एक-दोन-तीन-चार

मित्रांसंगे गिरवीन ग-म आणि आईचे करीन काम
आई-बाबा त्यांना माझा तीनदा नमस्कार

खूप शिकून मी मोठ्ठा होईन, डॉक्टर होउनी औषध देईन
सैनिक आणि गरिबांसाठी धावून मी जाणार

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.