A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
परिसा हो तुलसी-रामायण

मानव जन्मामधी नराचा होण्या नारायण
परिसा हो तुलसी-रामायण

प्रभु रामाचा पाय लागता
शिळेस आली दिव्य सजिवता
सती अहिल्या नामे करिती गौरव सारेजण

अनंत कोटी त्या पापांची
नगरी होती ती लंकेची
श्रीरामाचा बाण लागता पावन हो रावण

रामनाम ते घेऊन अधरी
अमर जाहली जगती शबरी
कैलासावर शिवपार्वती करिती पारायण
अहल्या - ब्रह्मदेवाची मानसकन्या. गौतम ऋषींची पत्‍नी. त्यांच्या शापाने ती शिळा झाली होती. रामाने सीताविवाहाला जाताना हिचा उद्धार केला.
परिसा - ऐकणे.
शबरी - एक भिल्लीण. श्रीरामांची एकनिष्ठ भक्तीण.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.