A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
निघाले असतील राजकुमार

निघाले असतील राजकुमार
पथ मिथिलेचे असतील चुंबित कमळदळे हळुवार

कुठे पहाटे तृणांकुरांवर
धुके पसरले असेल सुंदर
हिमरंगावर निळी पाऊले उमटवीत सुकुमार

कुठे तरूतळी सायंकाळी
विसावेल ती मूर्त सावळी
तरूशाखांनी असेल केला तारांसम झंकार

अंग थरथरे लवती लोचन
समीप असतील श्रीरघुनंदन
आज स्मराने हळू उघडिले आर्त मनाचे द्वार
तृण - गवत.
मिथिला - विदेह देशाची (जनक राजाची) राजधानी.