A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दारी उभी अशी मी

दारी उभी अशी मी गेली निघून रात
कुजबुज नाही घडली, झाली अबोल रात !

बिल्गून एकमेकां होते कपोत बसले
नि:शब्द श्वास त्यांचे दोन्ही उरी मिळाले
निर्जीव मीच होते, होती सजीव रात !

दिसला चकोर सखया चंद्रास बाहताना
दिसला चुकून वारा कलिकेस चुंबिताना
तारेच मोजिले मी, सरली तशीच रात !

स्वप्‍नात सत्य होते सारे मिळून गेले
गंधात धुंद होते ते जीव भावभोळे
निर्गंध मी परि रे, गेली रुसून रात !
कपोत - कबुतर.
चकोर - चांदणे हेच ज्याचे जीवन असा एक पक्षी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.