दासांचाही दास श्रीहरी
दासांचाही दास श्रीहरी नंदाचा नंदन
घाशितो नाथाघरी चंदन
कावडीवर कावडी
ओतिल्या आणुनिया तांतडी
विसरला भक्तसखा मीपण
नाथासह कीर्तनी
आपुल्या रंगे गुणगायनी
साथ दे चिपळ्यांची डोलून
भक्ताघरी राबतो
सहज तो भक्तांना लाभतो
प्रभूला भक्तीचे बंधन
घाशितो नाथाघरी चंदन
कावडीवर कावडी
ओतिल्या आणुनिया तांतडी
विसरला भक्तसखा मीपण
नाथासह कीर्तनी
आपुल्या रंगे गुणगायनी
साथ दे चिपळ्यांची डोलून
भक्ताघरी राबतो
सहज तो भक्तांना लाभतो
प्रभूला भक्तीचे बंधन
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | कुमुद अभ्यंकर |
चित्रपट | - | बाळा जो जो रे |
गीत प्रकार | - | चित्रगीत, भक्तीगीत |
कावड | - | जड पदार्थ नेण्यासाठी आडव्या बांबूच्या दोन टोकांस दोन दोर्या बांधून त्याला ओझी अडकवण्याची केलेली व्यवस्था. |