A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
देह देवाचे मंदिर

देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ॥१॥

जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर ।
जसे दुग्धामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणि ॥२॥

देव देहात देहात, का हो जाता देवळात ।
तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना ॥३॥
चक्रपाणि(णी) - हातात सुदर्शनचक्र असलेला- विष्णू / विष्णूचा आठवा अवतार- कृष्ण.

 

  पं. उदयराज गोडबोले