A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
देहुडा चरण वाजवितो

देहुडा चरण वाजवितो वेणु ।
गोपिकारमणु स्वामि माझा ॥१॥

देखिलागे माय यमुनेचें तीरीं ।
हात खांद्यावरी राधिकेच्या ॥२॥

गुंजावर्ण डोळे शिरीं बाबरझोटी ।
मयूर पिच्छ वेष्टी शोभतसे ॥३॥

सगुण मेघ:श्याम लावण्य सुंदर ।
नामया दातार केशवराज ॥४॥
गुंज - एक लहानसे लाल रंगाचे फळ.
देहुडा - वाकडा / पायावर पाय ठेवून.
पिच्छ - पक्ष्याचे पीस.
बाबरझोटी - अस्ताव्यत, मोकळे सुटलेले डोक्‍याचे लांब केस.
रमणा - पती / प्रिय.
वेष्टी - धोतर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.