A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
देव दयेचा अथांग सागर

देव दयेचा अथांग सागर
विश्वचि मानी तो आपुले घर

मेघ-घटातुनी जल तो ओती
मातीतून तो पिकवी मोती
अवघे जीवन त्याच्या हाती
नाव तयाचे कणाकणावर

आईरूपे तो माया करितो
पिता होउनी सदा रक्षितो
गुरुस्वरूपे ज्ञान शिकवितो
तिन्ही जगांचा तो जगदीश्वर

राम होउनी वचन पाळतो
कृष्णमुखाने गीता सांगतो
बुद्ध होउनी शांती निर्मितो
अनंतरूपे एकच ईश्वर

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  मन्‍ना डे, सुमन कल्याणपूर, बालकराम