A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
देव दिसला ग मला

सूर्यरथावर बसुनी आला नारायण माझा
दळींदराच्या घरी अवतरे लोकांचा राजा

देव दिसला ग मला देव दिसला
साधूसंतांच्या रूपाने मनी ठसला

सणासुदीचे दान म्हणू की दसरा आज दिवाळी
भाग्य जणू हे चालूxन आले हळव्या सोनसकाळी
मुला-फुलांच्या डोळ्यांमधुन हसला

अनेक देही एकच आत्मा नित्य करी वास
अंगणात या बसुनी खाऊ प्रेमाचा हा घास
सारे समान हो भेदभाव कसला

अनंत पापे धुवून जाती असली ही पुण्याई
प्रेमरूप हे क्रोधा आले, विष हे अमृत होई
बलिदानाने कलंक हा पुसला
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - बाळ पळसुले
स्वर- आशा भोसले
चित्रपट - पाटलीण
गीत प्रकार - चित्रगीत