A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तळपते विक्रम सौदामिनी

अभिमन्यूच्या रथी फडकते, रणीं ध्वजा आरुणी
तळपते विक्रम सौदामिनी

घोर प्रभंजन घुसळी सागर
तसे भडकले भीषण संगर
कंपित धरणी, कंपित अंबर
भैरवसा त्या रणी भासतो, बाल रथी आर्जुनी
तळपते विक्रम सौदामिनी

चक्रव्यूह तो, द्वार मृत्यूचे
कराल मुख जणू भीषणतेचे
आत उभे रथ धनुर्धरांचे
चाल करी त्या मतंग ज्यावर बाल सिंह गर्जुनी
तळपते विक्रम सौदामिनी

पांडवसेना विजयी होऊन
पुढे निघाली व्युहा भेदून
निघे वाहिनी पहाड फोडून
घन तिमिराच्या राशी नाशित, बाल रवि अग्रणी
तळपते विक्रम सौदामिनी

सरले पुढती द्रोण जयद्रथ
शल्य भोज कृप कर्ण महारथ
अभिमन्यू हो रणी भग्‍न-रथ
तरी तयाचे कौतुक तरळे, द्रोणांच्या लोचनी
तळपते विक्रम सौदामिनी
गीत -
संगीत -
स्वर- स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.
अरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.
कराल - भयंकर.
प्रभंजन - सोसाट्याचा वारा.
मतंग (मतंगज) - हत्ती.
संगर - युद्ध.
सौदामिनी - वीज.

 

  स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.