A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सांगू कशी ग मनाची

सांगू कशी ग मनाची व्यथा ही
पायदळीं कुस्‍करिल्या या फुलांची कथा ही

फुलली कलिका, प्रणया मनीं येइ भरती
पडता दंवबिंदू तुटे देठ पाकळीवरती
उरे एकली ग जुईची लता ही

मातीत मिळेनीहि तुझा गंध दरवळे
झुलवाया तुज वारा ग वळवि पाऊले
तुझा जीविता रे पाळणा रिताही

प्रीतिफुला बकुला रे, नच पुरता फुललासी
रंगविल्या आठवणी आसवांत उरलासी
जळे जीवनीं या फुलांची चिता ही
गीत- राजा बढे
संगीत - मधुकर गोळवलकर
स्वर - माणिक वर्मा
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- ३० जानेवारी १९५१