देव माझा जगाचा नायक
देव माझा जगाचा नायक
केली त्याशी आम्ही सोयरीक
मानपान करा सर्व काही
खुश नाही कधी होत व्याही
दोष लागे देऊनिया लेक
त्रास आम्हा होई त्यांची हौस
छळण्याचा तया भारी सोस
भोग त्यांना मला मात्र भीक
एकजात सगे सारे खोटे
मूर्तीमंत जणू वैर भेटे
दूर धावे जरी जवळीक
केली त्याशी आम्ही सोयरीक
मानपान करा सर्व काही
खुश नाही कधी होत व्याही
दोष लागे देऊनिया लेक
त्रास आम्हा होई त्यांची हौस
छळण्याचा तया भारी सोस
भोग त्यांना मला मात्र भीक
एकजात सगे सारे खोटे
मूर्तीमंत जणू वैर भेटे
दूर धावे जरी जवळीक
गीत | - | श्याम जोशी |
संगीत | - | दिनकर पोवार |
स्वर | - | जयवंत कुलकर्णी |
चित्रपट | - | सोयरीक |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
सगा | - | सोबती, मित्र, नातेवाईक. |