मल्हाराच्या सुरांत भिजुनी
मल्हाराच्या सुरांत भिजुनी चिंब पुन्हा ना होणे
अखेरची ही मैफिल रसिका, अखेरचे हे गाणे
तुझ्याचसाठी सूर सजविले
भाव मनींचे त्यात भिजविले
दरवळले त्या संगमातुनी स्वर-तालांचे लेणे
फिरुनी मैफिल आता ना परि-
सदैव राहील फुलत अंतरी
स्वीकारून तव दाद सुखाने पुन्हा समेवर येणे
अखेरची ही मैफिल रसिका, अखेरचे हे गाणे
तुझ्याचसाठी सूर सजविले
भाव मनींचे त्यात भिजविले
दरवळले त्या संगमातुनी स्वर-तालांचे लेणे
फिरुनी मैफिल आता ना परि-
सदैव राहील फुलत अंतरी
स्वीकारून तव दाद सुखाने पुन्हा समेवर येणे
| गीत | - | गुरु ठाकूर |
| संगीत | - | अच्युत ठाकूर |
| स्वर | - | शौनक अभिषेकी |
| चित्रपट | - | मर्मबंध |
| गीत प्रकार | - | चित्रगीत |
| लेणे | - | वस्त्र / अलंकार / भिंतीवरील अथवा दगडावरील कोरीव काम. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












शौनक अभिषेकी