देवा बोला हो माझ्याशी
देवा बोला हो माझ्याशी
तुम्हीच मजवर रुसल्यावरती
बोलू मी कोणाशी?
देह वाहिला तुमच्या पायी
जीवाशिवाची आशा नाही
कानी पडतिल बोल प्रभुचे
आशा हीच उराशी
तुम्हीच मजला बोल शिकविले
आज मौन का तुम्ही घेतले
बोल शिकवुनी माय अबोला
धरिते काय पिलाशी?
बोलायाचे नसेल जर का
बोलु नका, पण इतुके ऐका
कमलाक्षातुन कटाक्ष फेका
मजवरती अविनाशी
तुम्हीच मजवर रुसल्यावरती
बोलू मी कोणाशी?
देह वाहिला तुमच्या पायी
जीवाशिवाची आशा नाही
कानी पडतिल बोल प्रभुचे
आशा हीच उराशी
तुम्हीच मजला बोल शिकविले
आज मौन का तुम्ही घेतले
बोल शिकवुनी माय अबोला
धरिते काय पिलाशी?
बोलायाचे नसेल जर का
बोलु नका, पण इतुके ऐका
कमलाक्षातुन कटाक्ष फेका
मजवरती अविनाशी
गीत | - | रा. ना. पवार |
संगीत | - | बाळ माटे |
स्वर | - | ज्योत्स्ना भोळे |
गीत प्रकार | - | भक्तीगीत |