A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
देवा धरिलें चरण

देवा धरिलें चरण ।
भक्ति सुगति जगिं मजला ।
भाव बोल रुचवि कोण?
सकल तुज विभो, मान ! ॥

सान थोर जिवांसि ।
रक्षितोसि हृषिकेशी ।
अचल तुझ्या पदीं दीन ।
भय नुरवी होत लीन ॥
गीत- ना. वि. कुलकर्णी
संगीत - मा. कृष्णराव विनायकबुवा पटवर्धन
स्वर - पं. राम मराठे
नाटक- संत कान्होपात्रा
राग- भीमपलास
ताल-एकताल
चाल-बन्सीधरके चरन
गीत प्रकार - नाट्यगीत भक्तीगीत
नुरणे - न उरणे.
विभू - बलाढ्य, महान.
सान - लहान.