A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
देवा मला का दिली बायको

देवा मला का दिली बायको अशी?
शिकवून थकलो मी दर दिवशी!

श्रीमंताची लेक आहे आळशी अती
एवढिशी खोली तरी घाण ही किती
पलंगाच्या खाली सदा खेळती घुशी!

उपवास धरी, करी एकादशी
दिसभर पिते लस्सीवरही लस्सी
आणि फराळाने भरी दोन्हीही कुशी!

बॉबीकटवाली माझी राणी असे
हिच्या वागण्याने केले वेडेपिसे
धाकानं मी ओठावरची काढितो मिशी!

सत्यनारायणा तुझी पूजा घातली
हिच्या पुढे पोथी-पुरणेही वाचली
तरी गुलहौशी आहे जशीच्या तशी!
गीत- हरेंद्र जाधव
संगीत - मधुकर पाठक
स्वर - प्रह्लाद शिंदे
गीत प्रकार - लोकगीत