तांडा चालला रे गड्या
तांडा चालला रे गड्या तांडा चालला
आज हितं उद्या तिथं खेळ नवा मांडला
एक गाव सोडुनी दुसरं गाव जोडू या
मुशाफिरी वसती ही घडोघडी मोडू या
संसाराचा डोलारा पाठीवरी बांधला
वनवासी जिणं हे जल्माला लागलं
दु:खाचं काटंकुटं ठाई ठाई पेरलं
कधी सरंल वाट ही ठावं नाही कुणाला
हिरवळीचा बिछाना धुक्याची रे वाकळ
रात कधी संपली कधी झाली सकाळ
माकडाच्या माळाला झेंडा आज रोविला
आज हितं उद्या तिथं खेळ नवा मांडला
एक गाव सोडुनी दुसरं गाव जोडू या
मुशाफिरी वसती ही घडोघडी मोडू या
संसाराचा डोलारा पाठीवरी बांधला
वनवासी जिणं हे जल्माला लागलं
दु:खाचं काटंकुटं ठाई ठाई पेरलं
कधी सरंल वाट ही ठावं नाही कुणाला
हिरवळीचा बिछाना धुक्याची रे वाकळ
रात कधी संपली कधी झाली सकाळ
माकडाच्या माळाला झेंडा आज रोविला
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | अरुण सरनाईक, कृष्णा कल्ले |
चित्रपट | - | डोंगरची मैना |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
तांडा | - | समुदाय / टोळी. |
वाकळ | - | पांघरूण. |