A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
देवा तुझी आठवण होते

देवा तुझी आठवण होते
सुख मावळते आणि शिरावर संकट कोसळते

सुंदर सुमने मुकती प्राणा उरात घुसती काटे
आग धगधगे वरती-खाली वाळवंट रखरखते

दुबळ्या जीवा कळे न जेव्हा काय खरे अन्‌ खोटे
पिचते अंतर अन्‌ रक्ताचे पाणी-पाणी होते
केवळ ढळढळ अश्रू ढाळणे हेच नशिबी येते
सुमन - फूल.

 

Random song suggestion
  मोहनतारा अजिंक्य