देवमाणूस देवळात आला
धरमशाळंचं देऊळ झालं, चमत्कार झाला
देवमाणूस देवळात आला !
या उजाड माळावरती
माझ्या देवानं केली प्रीती
फुलबागेचं रूप पाहुनी हरपून जीव गेला
देवमाणूस देवळात आला !
गेला अंधार, सरली रात
नारायणाचा फिरला हात
दळिंदराच्या अंगावरती किरणांचा शेला
देवमाणूस देवळात आला !
वस्ती-वाडी ही खुळी झोपडी
मायलेकरं ही येडीबागडी
भगवंतानं भोळेपणाचा उद्धार लई केला
देवमाणूस देवळात आला !
देवमाणूस देवळात आला !
या उजाड माळावरती
माझ्या देवानं केली प्रीती
फुलबागेचं रूप पाहुनी हरपून जीव गेला
देवमाणूस देवळात आला !
गेला अंधार, सरली रात
नारायणाचा फिरला हात
दळिंदराच्या अंगावरती किरणांचा शेला
देवमाणूस देवळात आला !
वस्ती-वाडी ही खुळी झोपडी
मायलेकरं ही येडीबागडी
भगवंतानं भोळेपणाचा उद्धार लई केला
देवमाणूस देवळात आला !
| गीत | - | जगदीश खेबूडकर |
| संगीत | - | प्रभाकर जोग |
| स्वर | - | चंद्रशेखर गाडगीळ |
| चित्रपट | - | कैवारी |
| गीत प्रकार | - | चित्रगीत |
| दळिद्र | - | दारिद्र्य. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












चंद्रशेखर गाडगीळ